Wednesday 24 October 2012

आठवण


आठवण
आठवण आहे,
तिचं कामच आहे आठवत राहणे,
ती कधी वेळ काळ बघत नाही.
तिला वाटतं तेव्हा येऊन जाते.
कधी हसवते तर कधी रडवून जाते.

आयुष्यातले क्षण


इवल्याश्या  आयुष्यातले
जगतोय मी प्रत्येक क्षण
काही उमटवतात हस्य 
काही देऊन जातात नाही भरणारे व्रण

प्रत्येक क्षणात 
असते काही विलक्षण
आयुष्याचा गुंता सोडवण्यात 
गुंतून जाते हे मन

आपले हे मन 
असते अस्थिर प्रत्येक क्षण
असते गुंग शोधण्यात 
अंधारात प्रकाशाची किरण

थेंब थेंब तळे साचे
क्षण क्षण बिते जीवन 
अर्ध्यावरच राहून जाईल हे आयुष्य
जेव्हा न मिळतील काही क्षण





तो लाल गुलाब

करू नाही शकलो कधी व्यक्त 
माझ्या मनातल्या अनमोल भावना
भेटायच तर दूरच 
आपण कधी बोललो कि नाही हे सुधा मला आठवेना

आज तुला बोलणारच 
असा निश्चयच केला
दोन पानांचं प्रेमपत्र 
शेवटी पाण्यातच गेल

एकदा तुझ्या केसातून पडलेला गुलाब
आठवतो का तुला
जपून ठेवलाय तो मी अजून
कधी देऊ शकलो नाही मी तुला

कधी समजणार तुला 
माझ्या या भावना
कस सांगू तुला
आता हे दुख मला सोसवेना

कोलेज मध्ये असताना
नेहमी तुझ्या कढेच बघायचो
फक्त तुला बघण्यासाठी
दररोज लवकर कॉलेज मध्ये यायचो

कॉलेज संपले
पण व्यक्त करू शकलो नाही माझ्या भावना
भेटशीलच कधीतरी तू
तेव्हा प्रेमाने करेन तुझा सामना


आठवणींची आठवण


आठवणींची आठवण 
दररोज येते मला
तिला हि माझी आठवण येत असेल का ?
असा प्रश्न पडलाय मला

आठवणींची आठवण 
दररोज येते मला
कशी आहेस तू?
एकदा तरी सांग मला

आठवणींची आठवण 
दररोज येते मला
अजूनही हे काळीज धडधडतय तुझ्यासाठी
हे कस सांगू मी तुला

आठवणींची आठवण 
दररोज येते मला
जाताना दूर माझ्यापासून
रडवलच ना तू मला

आठवणींची आठवण 
दररोज येते मला
माझ्या विना जगणे
शक्य होईल का तुला?

आठवणींची आठवण 
दररोज येते मला
किती त्रास होतोय
काही ठाऊक आहे का तुला


आठवणींची आठवण 
दररोज येते मला
आठवतच तुझे सुंदर नयन
पसरते ह्या हृदयात शोक कळा

आठवणींची आठवण 
दररोज येते मला
का गेलीस तू 
एकटा सोडून मला..एकटा सोडून मला....एकटा सोडून मला

आठवणींची आठवण 
आठवणींची आठवण